उकाड्याने जालनेकर हैराण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

जालना - मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानामध्ये लाक्षणिक वाढ झाली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून जालना शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी (ता. 30) जालना शहराचा तापमानाचा पारा हा तब्बल 41.11 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला. 

मार्च महिना सुरू झाल्यानंतर जालनेकरांना मार्च हीटचा अनुभव आला आहे. मार्च महिन्याच्या एक तारखेपासून हळूहळू उन्हाच्या पाऱ्यामध्ये वाढ झाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा तब्बल चाळीस अंश सेल्सिअस पार करत आहे. परिणामी उकाड्याने जालनेकर हैराण झाले आहेत. या कडाक्‍याच्या उन्हामुळे अनेकांनी दुपारच्या वेळेत घरात थांबण्यावर भर देत आहेत. तसेच या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, रुमाल, चष्मे आदींचा वापर करताना दिसत आहेत. 

तसेच उन्हाची लाहीलाही कमी करण्यासाठी नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेण्यास सुरवात केली आहे. यात प्रमुख्याने उसाचा रस, लस्सी, ताक आदींचा समावेश आहे. पुढील एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये पारा अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: jalna @ 41.11