बसस्थानक जागा अतिक्रमण मुक्त; पोलिसांचा मोठा फौजफाटा

उमेश वाघमारे
सोमवार, 28 मे 2018

अतिक्रमण करणाऱ्या इसमने बसस्थानकाची जग स्वतःच्या नावे असल्याचे भूमि अधिलेख कार्यालयातून पीआर कार्ड ही तयार केले आहे. मात्र ही जागा बस स्थानकाची होती.

जालना - रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानकाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण सोमवारी (ता. 28) हटविण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होतो. 

रेल्वे स्थानक परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर त्यांच्या पत्र्याच्या सेडमध्ये एक इसमाने अतिक्रमण करुन परिवारसह राहण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे अतिक्रमण करणाऱ्या इसमने बसस्थानकाची जग स्वतःच्या नावे असल्याचे भूमि अधिलेख कार्यालयातून पीआर कार्ड ही तयार केले आहे. मात्र ही जागा बस स्थानकाची होती. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने बस स्थानकाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन बारी यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती होते.       

ही जागा रेल्वे कडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आलेली होती. मात्र मध्यतरी बशीर खान खत्रु खान याने अतिक्रमण केले. ते अतिक्रमण आज पोलिस बंदोबस्ता मध्ये काढून ताब घेतला आहे.
- यू. बी. वावरे, विभाग नियंत्रक, जालना. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Jalna Bus station encroachment free