सोयगाव देवीचे युवक आले, खड्डे बुजवून गेले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

भोकरदन - नवीन झालेल्या भोकरदन-जालना रस्त्याची काही महिन्यातच दुरवस्था झाली. त्यातच बरंजळा फाटा येथे मोठा खड्डा पडल्याने वाहने आदळून सतत अपघात होऊ लागले, अनेकांची नवी वाहनेही खिळखिळी झाली. त्यामुळे सोयगाव देवी येथील युवकांनी शुक्रवारी (ता.१) येथे दाखल होत रस्त्यावरील खड्डे मुरुमाने बुजविले.

भोकरदन-जालना रस्त्यावरील बरंजळा फाटा येथे अनेक दिवसांपासून खड्डा पडलेला आहे. यात वाहने आदळण्याचे प्रकार होतात.  कारसह छोट्या वाहनांचे फारच नुकसान व्हायचे. दुचाकीही घसरत होती. दुचाकीस्वार किरकोळ जखमी होत होते. या वैतागाला कंटाळून हा खड्डा बुजविण्यासाठी सोयगाव देवी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंता राऊत यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांनी एकत्र आणले. श्रमदान करून मुरूम, माती व जेसीबीच्या साहाय्याने हा खड्डा बुजविण्यात आला.जे काम कंत्राटदाराने करावयाला पाहिजे होते ते गावातील युवकांनी केले. या कामासाठी ज्ञानेश्वर राऊत, पुंडलिक राऊत, नारायण राऊत, तुळशीराम राऊत, शिवनाथ राऊत आदींनी परिश्रम घेतले.