तापमापीचा पारा जालना @ 38.40 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

जालना - यंदा कडाक्‍याच्या थंडीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात लाक्षणिक वाढ झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जालना शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (ता. एक) जालना शहराचा तापमानाचा पारा 38.40 अंश सेल्सिअसपर्यंत गेला. 

जालना - यंदा कडाक्‍याच्या थंडीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात लाक्षणिक वाढ झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जालना शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (ता. एक) जालना शहराचा तापमानाचा पारा 38.40 अंश सेल्सिअसपर्यंत गेला. 

मागील चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा जोरदार पाऊस झाला. त्यानंतर जालनेकारांनी कडाक्‍याच्या थंडीचाही आनंद घेतला. आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा कहर हळूहळू वाढू लागला आहे. सकाळी हलकी थंडी आणि दुपारी उन्हाचा कडाका असे वातावरण सध्या जालनेकरांना अनुभवण्यास मिळत आहे. त्यात आता मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी उन्हाचा पारा तब्बल 38.40 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला. त्यामुळे दुपारच्या वेळेत उकाड्याने जालनेकर हैराण झाले आहेत. या कडाक्‍याच्या उन्हामुळे अनेकांनी दुपारच्या वेळेत आपल्या कामांचा वेग कमी केला आहे; तसेच उन्हापासून संरक्षण करणाऱ्या बाबींची मागणीही आता हळूहळू होऊ लागली आहे. यात प्रमुख्याने टोप्या, रुमाल, चष्म्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे उन्हाच्या लाहीलाहीमुळे शीतपेयांची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणांवर शीतपेय दाखल झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. त्यामुळे संपूर्ण मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये उन्हाचा कडाका अधिक होण्याची शक्‍यता आहे. 

मराठवाडा

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाथरी : खाजगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर ही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - रेल्वेतील टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (ता. १६) अटक...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017