घोसला येथे वीज पडून दोनजण जखमी, एक बैल ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

जरंडी - सोयगावसह शिवारात महिनाभरापासून दांडी मारलेल्या पावसाने रविवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घोसला (ता. सोयगाव) शिवारात शेताच्या बांधावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला तर बैलाला सोडण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकरी बंधूंच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघेही गंभीर भाजले. 

घोसला शिवारात शेतकरी ज्ञानेश्वर नारायण डकले (वय ३५), भगवान रामेश्वर डकले (वय १९) हे दोघेही मजुरांनी वेचणी केलेला कापूस बैलगाडीत रचून, बांधावर बांधलेल्या बैलांना सोडून गाडीला जुंपण्यासाठी गेले असता, काही क्षणांत विजांचा कडकडाट होऊन बैलावर वीज कोसळली. या wघटनेत बैल जागीच ठार झाला तर दोघेही शेतकरी वीज कोसळल्याने गंभीररीत्या भाजले. 
या दोघांना सोयगावच्या शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा परदेशी यांनी त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सोयगाव परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने कपाशी पिके आडवी पडून कापूस लोंबकळला आहे. या पावसात सोयगाव शिवारात मोठे नुकसान झाले आहे. घोसला शिवारात पावसासह विजांचा कडकडाट सुरु होता. वादळी वारा मोठ्या प्रमाणावर असल्याने काही भागात घरांवरील पत्रे उडाले.

टॅग्स