जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ५५ टक्‍के

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ५५ टक्‍के

गुरुवारी २६ हजार ६६६ क्‍युसेकने आवक

औरंगाबाद - जायकवाडी धरणातील जिवंत साठ्याची टक्‍केवारी ५५ झाली आहे. सध्या जायकवाडीत २६ हजार ६६६ क्‍युसेकने पाणी येत आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या पावसामुळे विसर्ग वाढला आहे. जायकवाडीत जिवंतसाठा ४१.८३ टीएमसी झालेला आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता पूर्ण झालेली आहे. आता यापुढे ते पाणी साठवून ठेवू शकत नाहीत. एखाद्या धरणाचा अपवाद वगळला तर जवळपास सर्वच धरणांची पाणीपातळी ८५ ते १०० टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे या भागात आता पाऊस पडला तर तो सरळ गोदापात्रात येतो. आजच्या तारखेनुसार ज्याप्रमाणे धरणांमध्ये पाणी साठवून ठेवणे आवश्‍यक आहे त्याविषयीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. जायकवाडीच्या दिशेने येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे. नगर-नाशिक जिल्ह्यात पाऊस पडला तर ते पाणी मराठवाड्याच्या दिशेने येत आहे; परंतु वरील धरणांतून अपेक्षित असलेल्या प्रमाणात पाणी सोडले जात नाही.

धरणांमधून होणारा विसर्ग 

मुळा ९ हजार क्‍युसेक

भंडारदरा ४ हजार क्‍युसेक

निळवंडे ७ हजार १५५ क्‍युसेक

ओझरवेअर  १४ हजार ६७५ क्‍युसेक

गंगापूर २ हजार १६० क्‍युसेक

पालखेड ८ हजार ६५२ क्‍युसेक

कडवा ३ हजार ७४४ क्‍युसेक

दारणा ३ हजार १२८ क्‍युसेक

करंजवण ५ हजार क्‍युसेक

वाघाडा १ हजार २३७ क्‍युसेक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com