औरंगाबादेत एकला बारावी उत्तीर्णांसाठी "जॉब फेअर' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - बोर्ड ऑफ ऍप्रेंटिस (मुंबई) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातर्फे (औरंगाबाद) बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देवगिरी महाविद्यालयात एक डिसेंबरला "जॉब फेअर' होणार आहे. या माध्यमातून ऍप्रेंटिसशिप (शिकाऊ) व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून किमान पाचशेच्या आसपास विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकेल, असा अंदाज आहे. 

औरंगाबाद - बोर्ड ऑफ ऍप्रेंटिस (मुंबई) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातर्फे (औरंगाबाद) बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देवगिरी महाविद्यालयात एक डिसेंबरला "जॉब फेअर' होणार आहे. या माध्यमातून ऍप्रेंटिसशिप (शिकाऊ) व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून किमान पाचशेच्या आसपास विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकेल, असा अंदाज आहे. 

देवगिरी महाविद्यालय (औरंगाबाद), चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (सीएमआयए), मासिआ, एमसीटीसी आणि क्रेडाईच्या सहकार्याने देवगिरी महाविद्यालयात गुरुवारी (ता. एक) सकाळी दहापासून पुढे बारावी उत्तीर्णांसाठी जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळेल. जॉब फेअरमध्ये शंभरच्या आसपास कंपन्यांचे एचआर व्यवस्थापक सहभागी होण्याची शक्‍यता आहे. साधारणत: दीड हजार विद्यार्थी यात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. त्यापैकी पाचशे ते आठशे विद्यार्थ्यांना यातून एक वर्षाकरिता ऍप्रेंटिसशिपची संधी मिळणार आहे. एक वर्षाची ऍप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर काही कंपन्या आपल्या गरजेनुसार कर्मचाऱ्याचा परफॉर्मन्स पाहून कायमस्वरूपी करतात. काही विद्यार्थ्यांना पुढे नोकरीसाठी दुसऱ्या कंपन्यांत अनुभवाच्या जोरावर संधी मिळते. तर काही विद्यार्थी पुढे आपला स्वत:चा व्यवसायदेखील सुरू करतात. 

या जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी साडेआठला मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी एस. डी. गुंटूरकर, समन्वयक एस. एस. माळवदे, एन. एस. सर्जे यांनी केले. 

मराठवाडा

आष्टी - आई-वडील शिक्षक असलेल्या शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आष्टी शहरात आज घडली....

01.24 AM

दोन कुटुंबांतील पाच संशियत रुग्ण; आराेग्य विभागाचा दुजोरा अर्धापूर (नांदेड): अर्धापूर शहरात डेंगीचा रुग्ण आढळल्याची घटना ताजी...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

राष्ट्रवादी काँग्रेसचा सेलू तहसिल कार्यालयावर  मोर्चा सेलू (परभणी): गेल्या दीड महिण्यांपासून तालुक्यात पावसाने उघडीप...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017