केबीसी प्रकरणातील दोघांना पुन्हा पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

औरंगाबाद - केबीसी कंपनीत रक्कम गुंतवून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून भाच्याचीच तीन लाख 61 हजार दोनशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या मामासह त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत शुक्रवार (ता. वीस) पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले.

औरंगाबाद - केबीसी कंपनीत रक्कम गुंतवून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून भाच्याचीच तीन लाख 61 हजार दोनशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या मामासह त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत शुक्रवार (ता. वीस) पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले.

राजेश सूरजमल तोनगिरे (रा. अरिहंतनगर, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार 2013 मध्ये संशयित आरोपी व राजेश यांचे मामा कचरू लक्ष्मण मंडोरे, गोविंद मारोतराव केंद्रे (रा. दोघे महेंद्रनगर, परभणी) यांनी केबीसी कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले. मामावर विश्‍वास ठेवून राजेश यांनी 11 डिसेंबर 2013 ला रक्कम दिली होती. काही दिवसांनी केबीसी कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण याला फसवणूकप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याचे समजले. त्यानंतर आपलीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी कचरू मंडोरे व गोविंद केंद्रे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. सुरवातीला न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी बाजू मांडली.

मराठवाडा

गेवराई (जि. बीड) - भवानी अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे...

08.21 AM

औरंगाबाद - उत्तर प्रदेशात वेणी कापण्याच्या प्रकाराने खळबळ सुरू असतानाच आता औरंगाबादेत 14 वर्षांच्या मुलीची वेणी कापल्याची...

12.12 AM

वर्चस्वाच्या लढाईत भाजपचे विजयाकडे वाटचाल; 13 विरुद्ध शुन्य मतांचा ठराव औरंगाबाद: मराठवाड्याचे लक्ष लागून राहीलेल्या औरंगाबाद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017