बिकानेर एक्‍स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

केत्तूर - पारेवाडी रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेल्या बिकानेर ते बंगळूर सुपरफास्ट एक्‍स्प्रेसवर गुरवारी पहाटे चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने दगडफेक केली. यात एक पोलिस शिपाई जखमी झाला.

केत्तूर - पारेवाडी रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेल्या बिकानेर ते बंगळूर सुपरफास्ट एक्‍स्प्रेसवर गुरवारी पहाटे चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने दगडफेक केली. यात एक पोलिस शिपाई जखमी झाला.

आज पहाटे पुण्याहून सोलापूरकडे जाणारी बिकानेर-बंगळूर एक्‍स्प्रेस पारेवाडी स्थानकावर नांदेड-पुणे फास्ट एक्‍स्प्रेस जात असल्याने क्रॉसिंगसाठी थांबली होती. गाडी क्रॉसिंगसाठी थांबताच दबा धरून बसलेल्या चार-पाच जणांच्या टोळीने गाडीवर लुटीच्या उद्देशाने दगडफेक करीत आगेकूच केली. या वेळी तैनात असलेल्या पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या झटापटीत रेल्वे पोलिस शिपाई गणेश शिंदे हे जखमी झाले. पोलिसांच्या सावधगिरीमुळे गाडी सुखरुपपणे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. गाडी जाताच चोरटेही रिकाम्या हाताने पसार झाले.