रक्षा खडसे यांच्या कारची दुचाकीस्वाराला धडक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

आळंद - औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील आळंद (ता. फुलंब्री) येथे खासदार रक्षा खडसे यांच्या कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. 30) दुपारी तीनच्या सुमारास घडली. श्रीराम पुंडलिक पवार (वय 53, रा. देऊळगाव कमान, जि. जालना) असे जखमीचे नाव आहे. 

श्रीराम पवार हे दुचाकीने (एमएच-20 सीएच-5429) अंधारी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना त्यांना इनोव्हा कारने (एमएच-19 सीई-1919) धडक दिली. यात ते जखमी झाले. डोके व हाताला मार लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई तथा खासदार रक्षा खडसे या औरंगाबादकडे जात होत्या. धडक एवढी जबर होती की अपघातानंतर कारचे समोरील टायर फुटले. रक्षा खडसे यांनी रुग्णालयात जाऊन श्री. पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्या पुढे निघून गेल्या. वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मराठवाडा

उस्मानाबाद, लातूर - उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  खामसवाडी (ता....

03.51 PM

‘संस्थान गणपती’तर्फे साकारला जाणार सजीव देखावा, विविध कार्यक्रमांचे आयोजन  औरंगाबाद - शहरातील मानाचा म्हणून परिचित...

03.45 PM

शंभर कोटींच्या ३१ रस्त्यांना अखेर शासनाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली नियंत्रणाची जबाबदारी  औरंगाबाद -...

03.30 PM