कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

किल्लेधारूर (जि. बीड) - कर्जाबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (ता. 30) विष घेतलेल्या पाचपिंपळतांडा (ता. किल्लेधारूर) येथील शेतकरी रेवा नारायण आडे (वय 57) यांचा अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर बॅंकेसह खासगी सावकाराचे कर्ज होते. परतफेड शक्‍य न झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातून आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.