सासरच्या मंडळीकडून जावयाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) - पत्नीला माहेरहून आणायला गेलेल्या जावयावर सासूरवाडीत हल्ला झाला. यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) येथे रविवारी सकाळी हा प्रकार घडला. खंडू सर्जेराव लोंढे (वय 36) असे मृत जावयाचे नाव आहे.

याप्रकरणी लोंढे यांच्या नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, येथील खंडू लोंढे हे आठ ते दहा दिवसांपूर्वी गावाला गेले होते. त्यांची पत्नी रेखा चार मुलींसह अरगडे गव्हाण येथे माहेरी गेली होती. रविवारी सकाळी खंडू लोंढे पत्नीला आणण्यासाठी अरगडे गव्हाण येथे दुचाकीने गेले होते. दरम्यान, त्यांच्यात व सासरच्या मंडळीत वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात सासरा, सासू, पत्नी, मेहुणा व मेव्हुणी यांनी खंडू लोंढे यांना मारहाण केली व ते गंभीर जखमी होऊन कोसळले. या घटनेनंतर सासरचे सर्व जण फरारी झाले. जखमी लोंढे यांना उपचारासाठी जालना येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाइकांनी पोलिस चौकीत गर्दी केली होती.