लातूर जिल्हा होणार चूल आणि धुरमुक्त

विकास गाढवे 
गुरुवार, 12 जुलै 2018

लातूर : केंद्र सरकारने एक एप्रिलपासून पंतप्रधान उज्वला गॅस योजनेची व्याप्ती वाढवली असून पूर्वी केवळ दारिद्रय रेषेखालील लाभार्थींना देण्यात येणारा योजनेचा लाभ आता आणखी लाभार्थींना मिळणार आहे. या योजनेचा मोठ्या संख्येने लाभार्थींना लाभ देऊन आणि उरलेल्या लाभार्थींना जिल्हा नियोजन समितीतून अर्थसाह्य देऊन जिल्हा धूर आणि चुलमुक्त करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हाती घेतला आहे. यामुळे येत्या काळात घरोघरी असलेल्या मातीच्या चुलीची जागा गॅसची शेगडी अन् सिलेंडर घेणार आहे. 

गरीबांच्या घरीही गॅसची जोडणी देण्यासाठी सरकारने पंतप्रधान उज्वला योजना हाती घेतली. या योजनेतून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅसची जोडणी देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मोठ्या संख्येने लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. एप्रिलपासून सरकारने योजनेची व्याप्ती वाढवली असून आता दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध कंपन्यांकडून चार लाख 78 कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली असून जवळपास एक लाख कुटुंबांकडे गॅस जोडणी नसल्याचे प्राथमिक माहिती आहे. व्याप्ती वाढल्याने एक लाख कुटुंबांपैकी 75 हजार कुटुंबांना पंतप्रधान उज्वला योजनेचा लाभ देणे शक्य आहे. उर्वरित पंचेवीस हजार कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीतून देण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अनुकूलता दाखवली आहे. यामुळेच येत्या काळात जिल्हा धुर आणि चुलमुक्त होणार असून प्रत्येक कुटुंबांला गॅसची जोडणी देण्यासाठी मोहिम राबवली जाणार आहे.  

पहिल्याच बैठकीतून चालना
लातूर जिल्हा निर्धूर झाल्यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाचेही मोठे रक्षण होणार आहे. या उपक्रमाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नुकतीच सर्व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात पंतप्रधान उज्वला योजनेचा व्यापक प्रमाणात लाभ देण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधान उज्वला योजनेतून लाभार्थींच्या वाट्याची रक्कम बिनव्याजी कर्जावर उपलब्ध करून देण्यात येत असून ही रक्कम लाभार्थीला गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या अनुदानातून कपात करून घेता येत असल्याचे एचपी गॅस कंपनीचे सहायक विक्री व्यवस्थापक कौशल खंडेलवाल यांनी सांगितले. 

Web Title: latur district becomes chul and reek free