तनिष्कांच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्हा सज्ज

तनिष्कांच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्हा सज्ज

जिल्ह्यात 44 ठिकाणी होणार निवडणूक; मंगळवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
लातूर - जिल्ह्यात सामाजिक बदलाची सुरवात करून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या तनिष्का सदस्या आता निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात 44 ठिकाणी निवडणूक होणार असून रविवारी (ता.13) सकाळी आठ ते दोन या वेळेत मतदान होणार आहे. राज्यात प्रथमच या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीत सहभागी प्रत्येक उमेदवाराला एक टोलफ्री मोबाईल क्रमांक दिला जाणार आहे. त्यावर मिस्ड कॉल देऊन मतदान करता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद येथे तनिष्का निवडणूक झाली. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातील एक-एका उमेदवाराला आठ-आठ हजार मिस्ड कॉल मिळवणे शक्‍य झाले.

"सकाळ'ने उभारलेल्या अत्याधुनिक सुविधेमुळेच हे शक्‍य झाले आहे. याच सुविधेमुळे लातूर जिल्ह्यातील महिलाही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

शनिवारी (ता.5) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पहिल्याच दिवशी लातूर पश्‍चिममधून दोन उमेदवारांनी अर्ज भरले. ग्रामीण भागातील सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया महिलांच्या आग्रहामुळे मंगळवारपर्यंत (ता.8) सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी प्रचारासाठी दिवाळीची संधी साधून प्रचाराला सुरवातही केली आहे. जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी महिलांनी एकीकडे भेटीगाठींना प्रारंभ केला आहे, तर दुसरीकडे आपापले आडाखे बांधून उमेदवारी अर्ज भरण्यास मैत्रिणींनाही प्रोत्साहन देत आहेत. या निवडणुकीमध्ये पराभव असणार नाही, कारण पडलेल्या मतांवर क्रमवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा एक अनुभव म्हणून वकील, डॉक्‍टर्स, प्राध्यापक आणि राजकीय महिला सदस्यांनी या प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यास सुरवात केली आहे. महिलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील आठवडा संपूर्ण जिल्हा तनिष्कामय होऊन निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगणार आहे. तनिष्का व्यासपीठाचा उद्देश तळागाळापर्यंत पोचला असून सध्या महिलांत या उपक्रमांचीच चर्चा सुरू आहे. प्रचारात कोणते तंत्र अवलंबले जावे, कुठे कुठे बैठका घ्याव्यात, मतदानासाठी कसे नियोजन असावे, याबाबत आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गावोगावी ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेऊन बैठकांना प्रारंभ झाला असून आता प्रचाराला आणखी वेग येणार आहे.

मतदान 13 नोव्हेंबरला
लातूर शहर पूर्व
लातूर शहर पश्‍चिम
लातूर तालुका
मुरूड, सारोळा
शिरूर अनंतपाळ तालुका
शहर, येरोळ, उजेड, हिप्पळगाव

जळकोट तालुका
शहर, कुन्की

देवणी तालुका
शहर, बोरोळ, धनेगाव, वलांडी

रेणापूर तालुका
शहर, पोहरेगाव, खरोळा, पानगाव

चाकूर तालुका
शहर, नळेगाव, चापोली, वडवळ

उदगीर तालुका
शहर, वाढवणा, देवर्जन, लोहारा

निलंगा तालुका
शहर, मदनसुरी, औराद शहाजानी, पानचिंचोली, तगरखेडा, शेळगी

अहमदपूर तालुका
शहर, किनगाव, हाडोळती, सताळा

औसा तालुका
शहर, किल्लारी, चिंचोली काजळे, उजनी
जिल्ह्यात या ठिकाणी 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः संभाजी रा. देशमुख 9011087791

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com