हुतात्म्यांच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास - संभाजी पाटील निलंगेकर

हुतात्म्यांच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास - संभाजी पाटील निलंगेकर

लातूर - मराठवाडा मुक्तिसंग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात ज्या थोर वीरांनी आपले जीवन समर्पित केले, आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या बंधनातून मुक्त केले. त्यांच्या प्रेरणेमुळेच मराठवाड्याचा विकास झाला आहे, असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. १७) टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात श्री. निलंगेकर बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे, लातूरचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्दन विधाते, स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

भारताला ता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळून देशातील ५६५ पैकी ५६२ संस्थाने स्वतंत्र्य भारतात विलीन झाली होती; परंतु हैद्राबाद, काश्‍मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने मात्र अलिप्त होती. मराठवाड्यातील जिल्हे निजाम संस्थानाच्या राजवटीखाली पारतंत्र्यात होते. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा सुरू झाला होता. तसेच मराठवाड्याच्या गावागावातून हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढा अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तेजस्वीपणे लढला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे आंदोलन सतत १३ महिने सुरू होते. निजामाच्या बंधनातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. याच जिल्ह्याचे विभाजन होऊन आपला लातूर जिल्हा अस्तित्वात आला आहे, असे श्री. निलंगेकर यांनी या प्रसंगी सांगितले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या वेळी श्री. निलंगेकर यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

मराठवाडा मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार
लातूर - मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून (ता. १७) येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पाकिस्तानात अनेक वर्षे तुरुंगवास भोगून आलेल्या देशभक्तांचा, तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर होते. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही एकमेव राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. ज्या संघटनेचे संपूर्ण भारतातून पदाधिकारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी लातूर येथे दरवर्षी येतात. त्यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो. श्री. खंडापूरकर यांचे कार्य अभिनंदनीय व उल्लेखनीय आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा व अनेक वर्षे पाकिस्तानी तुरुंगवास भोगून आलेल्या देशभक्तांचा सत्कार करण्याचा योग मला प्राप्त झाला असे श्री. निलंगेकर म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, देशभक्त सरबतजितसिंह यांची बहीण  बलजिंदर कौर, पाकिस्तानची १५ वर्षांपेक्षा जास्त जेल भोगलेले देशभक्त विनोद सहानी, प्रदेश अध्यक्ष विलास शेडगे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास महापौर श्री. सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सभापती संजय दोरवे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे राष्ट्रीय सचिव अमोल नान्नजकर यांनी केले. राष्ट्रीय प्रवक्ता नैन छबिला नैन यांनी आभार मानले. या कार्यक्रमास हर्षवर्धन आकनगिरे, वैजनाथ पाटील,  राणी स्वामी, पृथ्वीराज पाटील, राम पवार, श्रावण रावणकुळे,  आकाश गडगळे,  राजेश पवार, अमोल गायकवाड, नितीन जाधव, किरण मुंडे, गोविंद मुंडे, किशोर जाधव, मीनाक्षी दोरवे, शाम जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com