वारकरी हाच महाराष्ट्राचा खरा श्वास - औसेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

लातूर - भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारा वारकरी महाराष्ट्राचा श्वास आहे, असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बुधवारी बोलत होते.

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे आयोजित केलेल्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सत्रांत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बापूसाहेब देहूकर, निवृत्ती नामदास, अरुण बुरघाटे आदी उपस्थित होते. गहिनीनाथ महाराज म्हणाले, की वारकरी सांप्रदाय आपल्यापरीने जनजागृती व सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. संतसाहित्य संमेलनाच्या माध्यमातून मांडलेले ठराव वारकरी संप्रदायाच्या भरीव सामाजिक कार्याची साक्ष देत आहेत.