महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले 

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले 

लातूर - महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीचे बुधवारी (ता. 22) बिगूल वाजले. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार ता. 19 एप्रिलला मतदान आणि ता. 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या 18 प्रभागांतून बहुसदस्यीय पद्धतीने 70 सदस्यांची निवड करण्यासाठी शहरातील दोन लाख 78 हजार 374 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली आहे. 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ही मतदानाची प्रक्रिया होईल. यासाठी ता. पाच जानेवारी 2017 रोजी अस्तित्वात असलेली लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी वापरली जाणार आहे. महापालिकेच्या हद्दीत दोन लोख 84 हजार 419 मतदार होते. त्यांपैकी सहा हजार 45 मतदारांना वगळले असून, 

उर्वरित दोन लाख 78 हजार 374 मतदारांना मतदानाचा हक्क प्राप्त आहे. त्यांत एक लाख 46 हजार 561 पुरूष तर, एक लाख 31 हजार 813 स्त्रीमतदारांची नोंद आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार बहुसदस्यीय पद्धतीने सदस्य निवडीसाठी शहराचे 18 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागांतून चार सदस्य निवडले जाणार असून, शेवटचा क्र. 18 हा प्रभाग त्रिसदस्यीय आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासप्रवर्ग व खुल्या गटासह महिलांसाठी आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरले जातील व सदस्यांची निवड होईल. 

असा राहील निवडणूक कार्यक्रम 
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ता. 27 मार्चपासून ता. तीन एप्रिलपर्यंत ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरता येतील. ता. पाच एप्रिलला छाननी व ता. सातला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ता. आठला उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह प्रसिद्ध केले जातील. त्यानंतर प्रचाराचा कालावधी मिळणार असून, ता. 19 रोजी मतदान व ता. 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी साधारणतः 350 ते 800 मतदारांसाठी एक याप्रमाणे 371 मतदान केंद्रांत मतदान घेतले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com