लातूर, नांदेड, उस्मानाबादेत जातपडताळणीचे काम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

लातूर - राज्य सरकारच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जातपडताळणी समिती स्थापन करण्याच्या निर्णयानुसार येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विभाजन झाले आहे. यामुळे सोमवारपासून (ता. 21) विभागातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद व हिंगोली येथे स्वतंत्र जिल्हा जातपडताळणी समित्यांचे कामकाज सुरू होत आहे.

विभागीय समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भरत केंद्रे यांनी ही माहिती दिली. यामुळे संबंधित जिल्ह्यातील जातपडताळणीसाठी नव्याने प्रस्ताव दाखल करू इच्छिणाऱ्यांनी व यापूर्वीच्या निर्णय न झालेल्या प्रस्तावासंबंधांतील नागरिकांनी सोमवारपासून त्यांच्या जिल्ह्यासाठीच्या जिल्हा जातपडताळणी समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने दीड वर्षापूर्वीच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जातपडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही कारणाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विलंब झाला. दहा दिवसांपूर्वी सरकारने जिल्हानिहाय समित्यांचे प्रत्यक्ष कामकाज सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला.