'एसीबी'च्या पोलिस उपअधीक्षकांना 50 हजारांची लाच घेताना अटक

Latur news ACB sub-inspector arrested for accepting a bribe of 50,000
Latur news ACB sub-inspector arrested for accepting a bribe of 50,000

लातूर : येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील (आरटीओ) एका मोटार वाहन निरीक्षकाला पन्नास हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅंटी करप्शन ब्युरो) मुंबईच्या पथकाने शुक्रवारी (ता. 11) विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक सुरेश शेटकर यांच्या कार्यालयासह त्यांच्या अहमदपूर येथील घरावर छापे घातले. त्यापूर्वी शेटकर यांच्या सांगण्यावरून मोटार वाहन निरीक्षकाकडून पन्नास हजार रूपयाची लाच स्वीकारताना आरटीओ कार्यालयाचा एजंट व ड्रायव्हींग स्कुलच्या मालकाला पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकालांवरच लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाल्याने विभागात खळबळ उडाली आहे. विभागाच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच कारवाई मानली जात आहे. आरटीओ कार्यालयातील एका मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला श्री. शेटकर यांनी काही दिवसापूर्वी संपर्क साधून तुमच्याविरूद्ध आमच्याकडे तक्रार असल्याचे सांगितले. तक्रारीची चौकशी न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. सुरवातीला किती रक्कमेची मागणी केली होती व त्यानंतर किती रक्कमेत तडजोड झाली, ही बाब लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनही गुप्त ठेवली आहे. लाचेची रक्कम आरटीओ कार्यालयाचा एजंट व दत्तमंदिर परिसरातील दत्तकृपा ड्रायव्हींग स्कुलचा मालक छोटू गडकरी याच्याकडे देण्याची सुचना शेटकर यांनी त्या अधिकाऱ्याला केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या अधिकाऱ्याने थेट मुंबईला जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फनसळकर यांची भेट घेऊन तुमच्या विभागाचाच अधिकारी लाच मागत असल्याचे सांगत रितसर तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिस महासंचालकांनी विशेष पथक स्थापन करून तक्रारीची खातरजमा करून घेली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी छोटू गडकरी याच्या दत्तकृपा ड्रायव्हींग स्कुलमध्ये सापळा लावला. यात संबंधित अधिकाऱ्याकडून पन्नास हजार रूपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना छोटू गडकरीला पथकाने अटक केली. अटकेनंतर पथकाने एका पथकाने तातडीने शेटकर यांच्या अहमदपूर येथील घराची झडती घेतली तर दुसऱ्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयावर छापा घेतला. या वेळी शेटकर नुकतेच कार्यालयातून बाहेर पडले होते. पथकाने कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाचा ताबा घेत कसून चौकशी केली. रात्रभर चौकशी पूर्ण करून शनिवारी (ता. 12) सकाळी शेटकर व गडकरी या दोघांविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक शेटकर फरार झाल्याचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले. या घटनेमुळे राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चांगलाच हादरा बसला असून या विभागाला पहिल्यांदाच आपल्याच अधिकाऱ्यांवर लाचप्रकरणी कारवाई करण्याची वेळ आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com