भाजप नेते पाशा पटेल यांची पत्रकाराला शिवीगाळ; गुन्हा दाखल

हरि तुगावकर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पटेल तेथे गेल्यानंतर तेथे असलेल्या एका दूरचित्रवाणीचे पत्रकार विष्णू बुरगे यांनी पटेल यांना यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली असे म्हटले. त्यानंतर पटेल यांनी या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली.

लातूर : येथील एका पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार भाजप नेते पाशा पटेल यांच्या विरोधात येथील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी पटेल एका पत्रकार परिषदेसाठी शासकीय विश्रामगृहात आले होते. तेथे एका सूटमध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवि तुपकर बसले होते. तुपकर यांनी पटेल यांना चहासाठी बोलावले होते.

पटेल तेथे गेल्यानंतर तेथे असलेल्या एका दूरचित्रवाणीचे पत्रकार विष्णू बुरगे यांनी पटेल यांना यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली असे म्हटले. त्यानंतर पटेल यांनी या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी बुरगे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

व्हिडीओ गॅलरी