ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लातूर शहर ग्रंथालयमय झाले आहे. शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवर मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत

लातूर - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या 54 व्या वार्षिक अधिवेशनास रविवारी ग्रंथदिंडीने उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. 16) अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार आहे.

जिल्हा ग्रंथालय संघ व महापालिकेचे श्री शिवछत्रपती ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने येथे प्रथमच अधिवेशन होत आहे. रविवारी ग्रंथदिंडीने अधिवेशनाची सुरवात झाली. महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्वागताध्यक्ष डॉ. अशोक कुकडे, संयोजक ऍड. त्र्यंबकदास झंवर, माजी आमदार गंगाधर पटणे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. पावसामुळे ही दिंडी जिल्हा क्रीडा संकुलाऐवजी साळाई मंगल कार्यालयापासून निघाली.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लातूर शहर ग्रंथालयमय झाले आहे. शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवर मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत.