लातूर: ट्रॅव्हल्स उलटून दहा प्रवासी जखमी

विकास गाढवे 
रविवार, 10 सप्टेंबर 2017

मुरूड (ता. लातूर) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले की,  मुंबई - उदगीर प्रवाशी वाहतुक करणारी ट्रॅव्हल्स सकाळी साडेसहा वाजता लातूर - मुरूड रस्त्यावरील बोरगाव (काळे) गावाजवळ उलटली. समोरुन येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाने ट्रॅव्हल्स थोडी रस्त्याच्या खाली घेतली. ती पुन्हा रस्त्यावर घेताना झोला बसून रस्त्यावरच उलटली.

लातूर : मुंबईहून उदगीरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस (ट्रॅव्हल्स) उलटून दहा प्रवाशी जखमी झाले आहेत. लातूर - मुरूड रस्त्यावर रविवारी (ता. दहा) सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमी प्रवाशांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार केंद्रात दाखल केले आहे.

मुरूड (ता. लातूर) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले की,  मुंबई - उदगीर प्रवाशी वाहतुक करणारी ट्रॅव्हल्स सकाळी साडेसहा वाजता लातूर - मुरूड रस्त्यावरील बोरगाव (काळे) गावाजवळ उलटली. समोरुन येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाने ट्रॅव्हल्स थोडी रस्त्याच्या खाली घेतली. ती पुन्हा रस्त्यावर घेताना झोला बसून रस्त्यावरच उलटली. या घटनेत ट्रॅव्हल्समधील दहा प्रवाशी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी लातूरला पाठवले. जखमींवर येथील सर्वोपचार केंद्रात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर लातूर - मुरूड रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती पुर्ववत केली आहे. अपघाताच्या ठिकाणी लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांनी भेट दिली. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचालकाविरूद्ध मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातातील जखमींची नावे अशी आहेत. सुंदरबाई माधवराव यादव (वय 40), देवेंद्र गणेश यादव (वय 40), अरविंद राम आलापूरे (वय 26), राजेश भानुदास जाधव (वय 25),  वंदना विकास सूर्यवंशी (वय 30), बबलू  अमरनाथ मंदाळ (वय 34), शोभाबाई विश्वनाथ कांबळे (वय 60), सखाराम वैजनाथ कसबे (वय 26), भाग्यश्री विलास सूर्यवंशी (वय 13) व बालाजी विश्वनाथ कांबळे (वय 34). हे प्रवाशी लातूर व उदगीर परिसरातील आहेत.