'महाराष्ट्राचा 420, देवेंद्र फडणवीस'; लातूरमध्ये आंदोलन

हरि तुगावकर
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

लातूर : 'महाराष्ट्राचा ४२० देवेंद्र फडणवीस', 'झेलो महंगाई मार, अब की बार फेकू सरकार', 'मोदी फडणवीस आये है साथ मे महंगाई लाये है', अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर काँग्रेसने मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात बोंबाबोंब ठोकली, उठाबशा काढल्या, निषेधाच्या घोषणा दिल्या.

लातूर : 'महाराष्ट्राचा ४२० देवेंद्र फडणवीस', 'झेलो महंगाई मार, अब की बार फेकू सरकार', 'मोदी फडणवीस आये है साथ मे महंगाई लाये है', अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर काँग्रेसने मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात बोंबाबोंब ठोकली, उठाबशा काढल्या, निषेधाच्या घोषणा दिल्या.

गेल्या काही दिवसात पेट्रोल, ड़िझेल भाव गगनाला भिडले आहेत. गॅसच्या सबसिडीवर सरकार डल्ला मारत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लक्ष वेधण्यासाठी व शासनाच्या सामान्यांच्या विरोधातील धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस रस्त्यावर उतरली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 'महाराष्ट्राचा ४२० देवेंद्र फडणवीस', 'झेलो महंगाई मार, अब की बार फेकू सरकार', 'मोदी फडणवीस आये है साथ मे महंगाई लाये है' , 'अब की बार फेकू सरकार', ''पेट्रोलवर जुलमी कर लावणाऱया भाजप सरकारचा धिक्कार असो', 'देख मोदी तेरा खेल सोने के दाम में मिलता है पेट्रोल डिझेल, अशा घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरच खांद्यावर घेतले होते. तर पेट्रोलदरवाढ झाल्याने दुचाकी आता परवत नाही. त्यामुळे दुचाकी बैलगाडीवर आणून या मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, शहरा्ध्यक्ष मकरंद सावे, पप्पू कुलकर्णी, प्रशांत पाटील आदी सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या वतीने येथील उषाकिरण पेट्रोलपंपाच्या समोर निदर्शने करण्यात आली. `रद्द करा रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा`, `शेतकऱयांना दिली नाही फुटकी कवडी , त्यांच्या नावावर गल्ला भरणाऱयांची लबाडी`, `सरकारच्या वाढदिवसासाठी जनतेच्या खिशात हात कशाला`, `कहाँ गये , कहाँ गये, अच्छे दिन कहाँ गये`, `सरकार निर्णयाचा उडालाय गोंधळ, जनतेत तर झाल्या मनीकल्लोळ`,  अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. शासनाच्या नावाने बोंबोही ठोकून उठाबशाही काढल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱायंना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यात शहराध्यक्ष मोईज शेख, अॅड. त्र्यंबकदास झंवर, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, नगरसेवक इम्रान सय्यद, सचिन बंडापल्ले आदी सहभागी झाले होते.