बनावट एक्‍स्चेंजप्रकरणी फरारी आरोपीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

लातूर - बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील फरारी आरोपी संजय केरबावाले याला दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी (ता. 24) एमआयडीसी परिसरातून अटक केली. त्याला 29 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने रविवारी (ता. 25) दिले आहेत. या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता सात झाली आहे. 

लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून, पोलिसांनी शहरात चार बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आणून सहा जणांना अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीची हवा खात आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या शंकर बिरादार याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी श्‍यामनगरमधील भागात टाकलेल्या छाप्यात बनावट एक्‍स्चेंज उघड केले होते. हे एक्‍स्चेंज चालवणारा संजय केरबावाले हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिसांनी छाप्यात बनावट एक्‍स्चेंजची यंत्रणा सिमकार्ड जप्त केल्यानंतरही अनेक दिवस त्याने पोलिसांना गुंगारा दिला. शनिवारी तो एमआयडीसी भागात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स