लातूरः वीजेच्या तारेला चिकटून मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

लातूरः येथील एसओएस परिसरात एका शेतात लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारेचा धक्का लागून तेरा वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याने नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह आज (गुरुवार) सकाळी महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवला. त्यानंतर महावितरणच्या वतीने तातडीची वीस हजाराची मदत  दिल्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेवून अंत्यविधी केला.

येथील एसओएस जयनगर परिसरात एका शेतात राजेंद्र मल्हारी कांबळे (वय १३) हा मुलगा आईकडे जात होता. वाटेत महावितरणची वीजेचे तार लोंबकळत होती. त्यात विद्युत प्रवाह आहे हे मुलाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्या  तारेजवळ जाताच तो तारेला चिकटला. त्यात विद्युत प्रवाह असल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

आज सकाळी त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवला. त्यानंतर महावितरणच्यावतीने तातडीने वीस हजार रुपयाची मदत करण्यात आली. तसेच नुकसान भरापाईचे आश्वासनही देण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेवून अंत्यविधी केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

टॅग्स