अपघातग्रस्तांसाठी धावले एसटी कर्मचारी

अपघातग्रस्तांसाठी धावले एसटी कर्मचारी

लातूर - गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार केंद्रातही रक्ताचा तुटवडा आहे. त्याचा फटका औसा-निलंगा रस्त्यावर शनिवारी (ता. १८) झालेल्या बस अपघातातील जखमींना बसला. रक्ताच्या बाटल्यांसाठी धावाधाव करावी लागली. हे लक्षात आल्यानंतर येथील एसटी महामंडळ सरसावले. महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील २७ कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात रक्तदान केले आहे. त्याचा फायदा या जखमींना झाला आहे. 

औसा-निलंगा रस्त्यावर चलबुर्गा पाटीजवळ शनिवारी दुपारी हा अपघात झाला होता. या अपघातात सात जण ठार, तर ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे स्वरूप गंभीर होते. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्याही जास्त होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. 

शासकीय रुग्णालयातही तशीच परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर व यंत्र अभियंता के. एस. लांडगे यांच्या पुढाकारातून येथील विभागीय कार्यशाळेतील २७ कर्मचाऱ्यांना एका बसमध्ये बसवून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. व्ही. बी. सातपुते, पी. एस. जाधव, डी. एच. तांबारे, एस. एच. सूर्यवंशी, एस. जी. उटगे, जी. व्ही. तळीखेडे, बी. जी. आदमाने, कैलास शिंदे, अनिकेत लेंढे, उत्तरेश्वर पिसाळ, कुरेशी शेख, एस. एम. काळे, रेश्‍मा पवार, दयानंद आगलावे, कैलास कांबळे, आर. बी. उटगे, बालाजी काळे, कृष्णा गिरी, योगेश रणखांब, धनराज  शिंदे, मोहन लव्हारे आदींनी रक्तदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com