लातूरच्या पाण्याला "पीएसी'ची मात्रा लागू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

लातूर - शहराला पुरवठा होणाऱ्या पिवळ्या पाण्यावर अखेर पीएसी पावडर व नवीन तुरटीची मात्रा लागू पडली आहे. पिवळ्या पाण्याने गुरुवारी (ता. 24) आपला पूर्ववत रंग आणला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पिवळ्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहराला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा हा चर्चेचा विषय झाला होता. महापालिकेने अनेक उपाययोजना करूनही पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत होता. बहुतांश नागरिक या पाण्याचा सांडपाण्यासाठीच वापर करीत होते. महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना ब्लीचिंग पावडर व तुरटीचा अधिक वापर करूनही पिवळ्या पाण्याचा रंग का बदलत नाही, याची चिंता होती. पण, पीएसी पावडर व नवीन तुरटीने पिवळा पाण्याचा रंग बदलतो याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने श्री. दिवेगावकर यांच्या सूचनेवरून सोलापूरहून ही पावडर व तुरटी आणण्यात आली. बुधवारपासून त्याचा वापर सुरू करण्यात आला. गुरुवारी सकाळपासून या पावडरचा व तुरटीचा वापर करून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. पिवळ्या पाण्याला या पावडरची मात्रा लागू पडली आहे. आज सोडण्यात आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याचे नमुनेही तपासण्यात आले आहेत. ते चांगले असल्याने अभियंत्यांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या पाण्याची प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी करण्यात येत असून लवकरच त्याचा अहवाल येण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर हे पिवळे पाणी कशामुळे येत होते, हे स्पष्ट होणार आहे. 

Web Title: latur news PAC powders and new Alum applied to the yellow water

टॅग्स