जिल्‍हाभरातील रस्‍त्‍यांना आले ‘बुरे दिन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

लातूर - राज्य शासन कितीही ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ होणार असे सांगत असले तरी लातूर जिल्ह्यात मात्र तशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डा हेच लक्षात येत नाही. याचा परिणाम अपघात होण्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते वाट पाहा, अशी भूमिका घेताना दिसून येत आहे. 

लातूर - राज्य शासन कितीही ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ होणार असे सांगत असले तरी लातूर जिल्ह्यात मात्र तशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डा हेच लक्षात येत नाही. याचा परिणाम अपघात होण्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते वाट पाहा, अशी भूमिका घेताना दिसून येत आहे. 

जिल्ह्यात सतत दोन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. याचा परिणाम लातूरहून उदगीरकडे, रेणापूरकडे, निलंग्याकडे, उमरग्याकडे, उस्मानाबादकडे, अंबाजोगाईकडे, नांदेडकडे अशा सर्वच ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांची वाट लागली आहे. ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. याचा परिणाम अपघात होण्यावर होत आहे. औसा ते लामजना रस्त्यावरील चार दिवसांपूर्वी झालेला अपघात याचाच एक भाग आहे. यात सात जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लहान अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. लातूरहून उदगीरला जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो; पण खराब रस्त्याने हे अंतर आता अडीच ते तीन तासांवर गेले आहे. अशीच परिस्थिती इतर रस्त्यांची आहे. नवीन रस्ते तर नाहीच; पण आहे त्या रस्त्यावरील खड्डेसुद्धा बुजवले जात नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यातून काही राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. त्यात लातूर-नांदेड, लातूर-तुळजापूर, लातूर-अंबाजोगाई अशा काही मार्गांचा समावेश आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न सुरू आहे. 

रस्ते महामार्गाकडे गेल्याने या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्तीचे कामच करीत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

४३ कोटींचा प्रस्ताव लालफितीत
सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्चमध्ये शहरातील अनेक रस्ते महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. शहरातील या प्रमुख रस्त्याचीदेखील वाट लागली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या खड्डे बुजविण्याचे थातूरमातूर काम सुरू आहे. महापालिकेने ४३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून हा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे.

Web Title: latur news road potholes issue