महाळंग्रावाडीत जलचळवळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

लातूर - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने महाळंग्रावाडी (ता. चाकूर) येथे सुरू झालेल्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला चळवळीचे स्वरूप आले आहे. यासाठी तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून महाळंग्रावाडी शिवारातील नाल्याच्या खोलीकरणाचे व  रुंदीकरणाचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे. तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या सदस्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कामात युवक व ग्रामस्थांनी हिरीरीने भाग घेतला. शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवाट्यासह हे काम पूर्णवास नेण्याचा संकल्प केला. तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानच्या सदस्या पूनम गुरमे, भागीरथीबाई शेळके, राजश्री शेळके, रेणुका नागरगोजे, मंगलबाई राचमळे, पूजा गुरमे, दैवशाला राचमळे, सत्यभामा सिंगापुरे, मीराबाई नागरगोजे, रूपाली सिंगापुरे, मीरा सिंगापुरे, सविता नागरगोजे, कमळबाई गुंडरे, सावित्रा राचमळे, संगीता राचमळे, आशा गुरमे, सुवर्णमाला राचमळे, प्रेमकला दंडिमे, संगीता राचमळे, सुनीता गुंडरे यांनी गावातील महिलांना सोबत घेऊन जलसंवर्धनाची चळवळ उभारली आहे. 

यासाठी सरपंच दयानंद दंडिमे, नारायण शेळके, भालचंद्र गुंडरे, नामदेव गुरमे, रमाकांत शेळके, तुकाराम सिंगापुरे, गणेश सिंगापुरे, नवनाथ गुरमे, महादेव गुरमे, श्रीहरी नागरगोजे, रवी राचमाळे यांच्यासह ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत.