सहकारमंत्र्यांचा हात फ्रॅक्‍चर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

लातूर - राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख रविवारी (ता. 25) येथे एका कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरत असताना पाय घसरून पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्‍चर झाले. येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते सोलापूरला रवाना झाले. 

देशमुख रविवारी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. लातूर अर्बन बॅंकेचा कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना देशमुख यांचा पाय पायरीवरून घसरला. या वेळी पायरीचा तुटलेला कोपरा त्यांच्या डाव्या हाताला लागला. उपस्थितांनी त्यांना सावरले. तेथून ते शासकीय विश्रामगृहात आले. हाताला वेदना होत असल्याने त्यांना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत हाताला लहान फ्रॅक्‍चर झाल्याचे आढळून आले. हाताला प्लास्टर केल्यानंतर लागलीच देशमुख सोलापूरला रवाना झाले.