एसटी बस-ट्रक अपघातात पाच ठार

एसटी बस-ट्रक अपघातात पाच ठार
एसटी बस-ट्रक अपघातात पाच ठार

औसा (लातूर): निलंगा-औसा राज्य महामार्गावर एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ५ प्रवासी ठार झाले असून, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

औसा निलंगा राज्य महामार्गावर आज (शनिवार) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निलंगा डेपोची बस क्रमांक एमएच २० डी ९६११ आणि निलंग्याकडून औश्याकडे येणारी ट्रक (क्र. एमएच १३ एके ४८३१) यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. यामध्ये बसच्या चालकाच्या केबीनपासून त्यामागील पाच सीटपर्यंत बसची उजवी बाजू पूर्णपणे कापली आहे. या अपघातात १० पेक्षा अधिक प्रवासी ठार झाल्याचे घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले.  घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा आणि काचेचे तुकडे पहावयास मिळत आहेत. या मार्गावर खड्डे खूप असल्याने ते चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बसमध्ये एकूण ७१ प्रवासी व चालक, वाहक असे ७३ जण होते. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी लामजना, औसा व लातूर येथे हलविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com