अपुरे जलकुंभ अन्‌ जलवाहिनी जुनी  त्यात गळतीला तर सीमाच नाही!

युवराज धोतरे
गुरुवार, 6 जुलै 2017

उदगीर - उदगीर शहराला सतावणारा व अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न केव्हा सुटणार? याची उदगीरकरांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाने मंजूर केलेल्या एकशे सात कोटी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण होऊन ती कार्यान्वित होण्याची गरज आहे. 

उदगीर - उदगीर शहराला सतावणारा व अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न केव्हा सुटणार? याची उदगीरकरांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाने मंजूर केलेल्या एकशे सात कोटी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण होऊन ती कार्यान्वित होण्याची गरज आहे. 

उदगीर शहर हे जिल्ह्यातील मोठे व झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून उदयास येत आहे. शहराला नगरपालिकेच्या मालकीच्या बनशेळकी साठवण तलावातून व भोपणी (ता. देवणी) येथील मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम प्रकल्पातून तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू आहे. भोपणी व बनशेळकी येथे पाणीसाठा असला तरी उदगीर शहरासाठी आवश्‍यक असलेल्या पाण्याची साठवणूक क्षमता नगरपालिकेकडे नाही. त्यामुळे शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे अपुरे जलकुंभ व जुन्या पाईपलाईनची व्यवस्था असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकिजेस आहेत. बनशेळकी व भोपणीहून उदगीरला येणाऱ्या पाईपलाईनही लिकेज असल्याने येथेही प्रचंड पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे. अपुरी जलकुंभ क्षमता व पाईपलाईनच्या लिकेजेसमुळे उदगीरला नियमितपणे पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर व विस्ताराच्या दृष्टीने उदगीर नगरपालिका केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेत सहभागी झाली. त्यातून उदगीरकरांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने पिण्याच्या कायमस्वरूपी योजनेसाठी एकशे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील काही कामेही सुरू झाली आहे. लिंबोटी (ता. अहमदपूर) येथून उदगीरला पाईपलाईन करण्यासाठी ७७ कोटी रुपयांची निविदा नगरपालिकेने काढली आहे; मात्र त्यात टेंडरपेक्षा जास्त खर्च येत असल्याने उर्वरित निधी शासनाकडून मिळण्याची मागणी नगरपालिकेने शासनाकडे केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी दिली आहे. उर्वरित तीस कोटी रुपयांची कामे त्यात सोलार सिस्टीम व इतर कामे टेंडर काढून नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. या योजनेत लिंबोटीहून आणलेले पाणी फिल्टर करून उदगीरकरांना पुढील पंचवीस वर्षे पुरेल एवढी साठवणूक क्षमता निर्माण केली जाणार असल्याचेही नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले.

टॅग्स

मराठवाडा

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM