जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

लातूर -  जिल्हा परिषदेच्या शाळा प्रामुख्याने ग्रामीण भागात आहेत. या शाळा येत्या डिसेंबरपर्यंत डिजिटल करण्यात येणार असून या कामी लायन्स क्‍लब परिवाराने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथे केले.

लातूर -  जिल्हा परिषदेच्या शाळा प्रामुख्याने ग्रामीण भागात आहेत. या शाळा येत्या डिसेंबरपर्यंत डिजिटल करण्यात येणार असून या कामी लायन्स क्‍लब परिवाराने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथे केले.

येथे रविवारी लायन्स परिवारातील नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी प्रांतपाल महावीर पाटणी, विभागीय अध्यक्ष दिलीप मोदी, डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. मन्मथ भातांब्रे, झोन चेअरमन योगेश तोतला, लायन्सचे ज्येष्ठ सदस्य धनंजय बेंबडे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या सर्व शाळा डिजिटल करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ऑगस्ट-स्पटेंबरमध्ये कॅन्सरमुक्त जिल्हा हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लायन्स परिवाराने दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक भार उचलून मुलींचे विवाह करून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत दोन कुटुंबे दत्तक घेण्याचे लायन्स क्‍लबने जाहीर केले. महावीर पाटणी यांनी लायन्स क्‍लबचे अध्यक्ष जयराम भुतडा, सचिव महेश मालपाणी, कोषाध्यक्ष कन्नन नाडर, लायन्स क्‍लब मिडटाऊनचे अध्यक्ष प्रमोद भोयरेकर, सचिव बाळासाहेब रेड्डी, कोषाध्यक्ष तुकाराम पाटील, लायन्स क्‍लब लातूर सिटीचे अध्यक्ष राजेश मित्तल, सचिव मनोज देशमुख, कोषाध्यक्ष बसवराज मंगरूळे, लायनेस क्‍लबच्या अध्यक्षा डॉ. शोभाराणी करपे, सचिव कुसुम राजमाने, कोषाध्यक्ष मीनाक्षी विभुते व अन्य पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली.  मावळते अध्यक्ष वेट्रीवेल नाडर, भागवत संपत्ते, गंगाबिशन भुतडा व साधना पळसकर यांनी आपला पदभार नवीन अध्यक्षांकडे सुपूर्द केला. या प्रसंगी सुनील लोहिया, धनंजय बेंबडे, जगदीश हेड्डा, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष जयराम भुतडा,  गगन मालपाणी, बाबूराव डांगे, अजय गोजमगुंडे, अनिरुद्ध कुर्डूकर, भारत माळवदकर, डॉ. रमाकांत शेंडगे, शिवशंकर पटवारी, पंकज परभणीकर, महादेव कानगुले, दीपक शिवपूजे, शरद मोरे, राजेश्‍वर डावरे, रामपाल सोमवाणी उपस्थित होते.