फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण

फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण

लातूर - जिल्हा परिषदेतील ऐतिहासिक विजयाचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, पक्षाच्या जयघोषात जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला. या आनंदोत्सवात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे सहभागी झाले होते. जिल्हा परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच येथे  भाजप राज आले आहे. त्यामुळे पक्षासाठी हा ऐतिहासिक क्षण होता.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात पक्षाने निवड होईपर्यंत नावांच्या बाबतीत सस्पेन्स कायम ठेवला होता. मिडियालाच नव्हे तर पक्षातील इतर पदाधिकाऱयांच्या बाबतीत गोपनियता पाळली होती. शेवटच्या क्षणी अध्यक्षपदी मिलिंद लातूरे व उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांच्या गळ्यात माळ टाकण्यात आली. भाजपचे सर्व सदस्य एका ट्रॅव्हल्समधून सरळ जिल्हा परिषदेत दाखल झाले. भगवे फेटे, गळ्यात पक्षाचे गमजे घालून हे सर्व सदस्य आले होते. हे सदस्य येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी केली. गुलालाची उधळण करीत भारतीय जनता पक्षाचा विजय असो, संभाजी पाटील निलंगेकर आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.  

मी शेतकरी व गरीब कुटुंबातील आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मला अध्यक्ष करून मोठी जबाबदारी टाकली आहे. प्रामाणिकपणे काम करून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठऱविण्याचा माझा प्रयत्न आहे. या माध्यमातून जनतेची सेवा करणार आहे.

-मिलिंद लातूरे, नूतन अध्यक्ष

जिल्हा परिषदेत भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लोकाभिमुख काम करण्यासाठी नूतन सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशासन यंत्रणेतही बदल करण्यात येतील. प्रामाणिकपणे काम केले जाईल.’’
- रामचंद्र तिरुके, नूतन उपाध्यक्ष.

देशमुख गटनेते
जिल्हा परिषदेत आता भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली. तर काँग्रेसच्या वतीने संतोष तिडके यांना गटनेतेपद देण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहात हे दोघे त्या त्या पक्षाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com