तपोवन एक्सप्रेसमधून दारुचा साठा जप्त

The liquor seized from Tapovan Express
The liquor seized from Tapovan Express

नांदेड : मुंबई- नांदेड येणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमध्ये डी-10 बोगीत दारुचा मोठा साठा रेल्वे सुरक्षा दलानी जप्त केला. मात्र पोलिस दिसताच दारु विक्री करणारे फरार झाले. ही घटना सोमवारी (ता. 16) उघडकीस आली.

मुंबईहून नांदेडकडे येणाऱ्या तपोवन एक्सप्रेस गाडीमध्ये नांदेड ठाण्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान जालना स्थानकावरून गस्तीसाठी चढले. त्यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी रेल्वेच्या प्रत्येक बोगीत तपासणी सुरू केली. यात आरपीएफचे विठ्ठल पवार, जगबीर सिंग, राजेश मीना यांनी शोध सुरू केला. यावेळी या पथकाला डी-10 बोगीत दोन बेवारस बॅग दिसल्या. त्यांनी त्या बॅगबद्दल विचारणा केली असता कोणीही समोर आले नाही. त्यांनी बॅगची परभणी येथे आल्यानंतर तपासणी केली. यावेळी त्या दोन्ही बॅग विदेशी दारुच्या जवळपास तीनशे बॉटलनी भरून दिसल्या. लहान मोठ्या बॉटल जप्त करून त्यांनी नांदेड येथे पोलिस निरीक्षक नविन प्रताप सिंह यांच्या समोर ठेवल्या.

जवळपास पन्नास हजाराची ही दारु जवानांनी जप्त केल्याबद्दल सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा मुद्देमाल त्यांच्या स्वाधीन केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com