मधुरांगण शॉपिंग उत्सवात बुकिंगसाठी आज शेवटची संधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

लातूर - "सकाळ मधुरांगण'च्यावतीने नवीन वर्षारंभ व मकर संक्रांतीनिमित्त ता. सहा, सात व आठ जानेवारीला शहरातील पारिजात मंगल कार्यालयात मधुरांगण शॉपिंग उत्सव- 2017 चे आयोजन केले आहे. यात एकाच छताखाली महिला व ग्राहकांना विशेष खरेदीचा आनंद घेता येईल. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना स्टॉल बुकिंगसाठी बुधवारपर्यंत (ता. 4) शेवटची संधी आहे. प्रचिती कॉम्प्युटर्स, लातूर हे या उत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. नव्या डिझायनर स्टुडिओ व ऍन आर्ट पेंटिंग क्‍लासेस, लातूर हे सहप्रयोजक आहेत. 

"सकाळ मधुरांगण'च्यावतीने शहर व परिसरातील महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत नववर्षाच्या आरंभी खास मकर संक्रांतीनिमित्त मधुरांगण शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात साडी, इमिटेशन ज्वेलरी, शो-पीस, लेडिज टॉप, पूजा भांडार, नमकीन स्वीट्‌स, मसाले, गृहोपयोगी वस्तू, ड्रेस मटेरियल, हॅण्डलूमच्या बांगड्या, संक्रांतीचे वाण, दैनंदिन वापरातील वस्तू व महिला गृहउद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीची सोय आहे. यात मधुरांगणच्या सदस्यांना व्यावसायिक संधी दिली जाईल. औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात ता. सहा, सात व आठ जानेवारी रोजी हा उत्सव सर्वांसाठी खुला आहे. शहर व जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायिक, व्यापारी व उद्योगांनी पूर्वनोंदणी व स्टॉल बुकिंगसाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी सकाळ विभागीय कार्यालय, शिवाजीनगर, लातूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन मधुरांगणच्या संयोजिका ऊर्मिला वरणे (मो. 8698303024) यांनी केले आहे. 

उत्सवातील सहभागी व्यावसायिक 
श्री ज्वेलरी ऍण्ड सारीज, सई फॅशन, श्री कलेक्‍शन ज्वेलरी ऍण्ड डिझायनर ब्लाऊज, तृप्ती कलेक्‍शन, नूपुरा सिल्क ऍण्ड कॉटन, कलश अगरबत्ती ऍण्ड पूजा भांडार व नमकीन स्वीट्‌स, ऍक्रॅलिक आर्ट ऍण्ड क्राफ्ट, कल्पना हॅन्डीक्राफ्ट, सन्मती गृहउद्योग, निहारिका लेडिज वर्ल्ड, भाग्यलक्ष्मी एजन्सी, नव्व्या डिझायनर स्टुडिओ, तस्विका कलेक्‍शन, कोमल ज्वेलर्स, प्रचीती कॉम्प्युटर्स, ऍन आर्ट पेंटिंग क्‍लासेस, श्रीकृष्ण साडी सेंटर, व्हिनस स्नॅक्‍स- दिशा एंटरप्रायजेस (सुपर स्टॉकिस्ट), 
साई एजन्सी (डिस्ट्रिब्युटर), लातूर.

Web Title: Madhurangana shopping festival booking for this last chance

टॅग्स