राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ परभणीतून रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मध्यप्रदेश येथे होणाऱ्या नाईन-अ-साईड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी परभणीतून महाराष्ट्राचा संघ रवाना आज (शुक्रवार) झाला. येथील डॉ. झाकीर हुसेन महाविद्यालयाच्या मैदानावर राज्य व जिल्हा नाईन-अ-साईड फुटबॉल संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

परभणी - मध्यप्रदेश येथे होणाऱ्या नाईन-अ-साईड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी परभणीतून महाराष्ट्राचा संघ रवाना आज (शुक्रवार) झाला. येथील डॉ. झाकीर हुसेन महाविद्यालयाच्या मैदानावर राज्य व जिल्हा नाईन-अ-साईड फुटबॉल संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतून मध्यप्रदेशातील देवास येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुलबॉल स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड करण्यात आली. या संघाला जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक गुलमीरखान, राष्ट्रीय खेळाडू मोहम्मद गौस, विनोद कदम, रवि सोनकांबळे, ऍड. मुजाहेद यांनी संघाला व प्रशिक्षक सय्यद नोमान, व्यवस्थापन सलीमखान, कर्णधार खाजा नईम मोहियोद्दीन यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनचे सचिव मोहम्मद मुसा, बशीर, मुन्नाखान, शाकेर बेग, मोहम्मद एकबाल यांची उपस्थिती होती.