संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरात शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

शिवसेनेतर्फे राज्यभरात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवून ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबाद : शासनाने कर्जमाफी करून फसव्या याद्या जाहीर केल्या आहेत, असा आरोप आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी करत शिवसेनेतर्फे राज्यभरात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवून ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबाद सोमवार (ता. 10) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने आंदोलन सुरू केल्यानंतर बँकेचे प्रवेशद्वार बंद करून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, नंदू घोडेले, राजू वैद्य, संतोष जेजुरकर यांची उपस्थिती होती.

नाशिक जिल्हा बँकेसमोरही शिवसैनिकांनी केले ढोल बजाओ आंदोलन.

सांगलीमध्ये शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या समोर ढोल आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर : कर्जमाफीतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यासाठी शिवसेना ढोलताशा आंदोलन.

मनमाड : संपूर्ण कर्जमाफीने करण्यासाठी मनमाड शहर शिवसेनेचे बँकांपुढे ढोल बजाओ आंदोलन; बँक व्यवस्थावकांना दिले निवेदन.

हिंगोली, नांदेड : शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीच्या मागणीसाठी शिवसेनेचे मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून शिवसैनिकांनी आंदोलन केले. त्यानंतर हिगोलीचे प्रमुख संतोष बांगर यांनी भाषण केले.

उस्मानाबाद : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची यादी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी (ता. १०) उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर अर्धा तास ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.

बीड : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने धरणे आंदोलन केले.

लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शिवसेनेचे आंदोलन.

बारामती : जिल्हा बँका शेतकऱ्यांना अनुदान देत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज बारामतीत ढोल बजाओ आंदोलन.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​