'महेश’ सुरु होणार ; आष्टीसह तीन तालुक्यांचा ऊसप्रश्न सुटणार

'महेश’ सुरु होणार ; आष्टीसह तीन तालुक्यांचा ऊसप्रश्न सुटणार

आष्टी (जि. बीड) : सहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या तालुक्यातील जळगाव येथील महेश सहकारी साखर कारखाना सुरु होणार असल्याने आष्टीसह पाटोदा व शिरुर कासार तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्रश्न सुटणार आहे. कारखान्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी (ता. २१) आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सुरु झाले.

जिल्ह्यातील सर्वात जुना असलेल्या कडा सहकारी साखर कारखान्याची स्थापना आणि उभारणी दिवंगत जेष्ठ नेते श्रीपतराव कदम यांनी केली. अलीकडील काळात अनेक वर्षांपासून कारखाना संचालक मंडळावर आमदार भीमराव धोंडे यांचे वर्चस्व आहे. या कारखान्यामुळे आष्टीसह पाटोदा व शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होई. मात्र, मध्यंतरी अनेक वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटल्याने कारखाना बंद पडला. 2012 मध्ये कारखान्याचा शेवटचा गाळप हंगाम झाला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखान्याकडे असलेल्या थकित कर्जामुळे कारखाना जप्त केला होता.

दरम्यान, अलीकडे कारखान्याचे सर्वेसर्वा भीमराव धोंडे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश येऊन बॅंकेचे आठ कोटी 15 लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर बॅंकेने हा कारखाना प्रशासक मंडळास 10 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला आहे. 

अनेक वर्षे कारखाना बंद अवस्थेत असल्याने मशिनरी गंजली असून झीज झालेली आहे. कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने तिची डागडुजी आता सुरू करण्यात आली आहे. येत्या महिना दीड महिन्यात हे काम पूर्ण होऊन बॅयलर अग्निप्रदीपन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

धडाडी दाखविल्याने यशाची आशा

बॅंकेचे कर्ज व कारखाना सुरू करण्यासाठी येणारे 25 ते 30 कोटी रुपयांचा खर्च यामुळे कारखाना सुरू करण्याची स्थिती नव्हती. मात्र, तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे धाडसाने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने यश येण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com