माजलगाव शहरातील रस्त्यांवर  खड्डेच खड्डे चोहीकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

माजलगाव - मुख्य रस्त्यासह शहरातील जवळपास सर्वच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे वाहनधारकांना मणक्‍याचे आजार जडले असून पावसाळ्यात खड्ड्यांतील साचलेले पाणी अंगावर उडत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोट्यामोठ्या अपघातांच्या घटनाही अनेक वेळा घडत आहेत.

माजलगाव शहरातील करवा पेट्रोलपंप ते संभाजी चौकदरम्यान मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर सर्व व्यापारी दुकाने असून मोठी बाजारपेठ असल्याने वाहने, नागरिकांची मोठ्या प्रमाणात  वर्दळ असते. या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. पावसानंतर या खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनांमुळे उडालेले पाणी रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. 

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते, अशावेळी खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात छोटेमोठे अपघात होत असल्याचा घटना वाढल्या आहेत. हा रस्ता शहराचा मुख्य रस्ता असला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने नगरपालिका या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करते. मुख्य रस्त्याप्रमाणेच शहराच्या वॉर्डांतील रस्ते, जुना मोंढा, शासकीय विश्रामगृह रस्ता, समता कॉलनी, बॅंक कॉलनी आदी भागातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिकेने अनेक भागांत नव्याने केलेल्या सिमेंट रस्त्यावरही खड्डे झाले आहेत. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांत असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन डासांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. यामुळे पालिकेने वेळीच लक्ष घालून रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: majalgaon news Potholes