माजलगाव तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

माजलगाव - तालुक्‍यातील गोविंदवाडी येथील शेतकरी बाबासाहेब श्‍यामराव नागरगोजे (वय 48) यांनी सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शनिवारी (ता. 23) गळफास घेऊन आत्महत्या केली.

माजलगाव - तालुक्‍यातील गोविंदवाडी येथील शेतकरी बाबासाहेब श्‍यामराव नागरगोजे (वय 48) यांनी सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शनिवारी (ता. 23) गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागरगोजे यांच्याकडे गोविंदवाडी येथे एक एकर जमीन होती. पिकाचे यंदा नुकसान झाल्याने मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून त्यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे व एक विवाहित मुलगी आहे.