मांजरा धरणाचे दरवाजे बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

लातूर - लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी (ता. 27) दुपारी बंद करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा येवा कमी झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. 

या वर्षी मांजरा धरणात पाणी येते की नाही अशी परिस्थिती होती. पण परतीच्या पावसाने मात्र धरण पाण्याने तुडुंब भरले. सोमवारी (ता. 26) धरणाचे सहा दरवाजे उघडून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्याची वेळ आली. सोमवारी दिवसभर पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा येवा कमी झाला. 47 घनमीटर प्रतिसेकंदने पाणी धरणात येत आहे. परिणामी मंगळवारी सकाळी पहिल्यांदा दोन दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर दोन तासांनी दोन दरवाजे बंद करण्यात आले. दुपारी दोन वाजता उर्वरित दोन दरवाजे बंद करण्यात आले. पाऊस पडून पाण्याचा येवा वाढला तरच आता दरवाजे उघडले जाण्याची शक्‍यता आहे.

टॅग्स