गावे पाणीदार करण्यासाठी सरसावले अनेकांचे हात

रामदास साबळे
मंगळवार, 23 मे 2017

केज - यापुढे पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी शासकीय योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा केज तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये यावर्षी श्रमदानातून ही कामे करण्यात आली. 

जलसंधारण्याच्या कामांत अनेकांचे हात पुढे आले. मागील काही वर्षांत बीड जिल्ह्याने पाणीटंचाईची दाहकता अनुभवली. यातून कायमची सुटका करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारसारखी योजना राबवण्यात आली. 

केज - यापुढे पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी शासकीय योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा केज तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये यावर्षी श्रमदानातून ही कामे करण्यात आली. 

जलसंधारण्याच्या कामांत अनेकांचे हात पुढे आले. मागील काही वर्षांत बीड जिल्ह्याने पाणीटंचाईची दाहकता अनुभवली. यातून कायमची सुटका करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारसारखी योजना राबवण्यात आली. 

दुष्काळी परिस्थितीतून जनतेची कायमची मुक्तता करण्यासाठी सकाळ रिलीफ फंड, पाणी फाउंडेशन, नाम, दिलासा, मानवलोक अशा स्वयंसेवी संस्थांनी गावे पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामे हाती घेतली. या कामासाठी गावकऱ्यांसोबत सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, बचतगटाच्या सदस्य, महिला, तरुण, बालके, वृद्ध यांचे हात मोठ्या प्रमाणात पुढे आल्याने जलसंवर्धनाची मोहीम लोकचळवळ बनली. 

तालुक्‍यातील पळसखेडा, काशिदवाडी, चंदनसावरगाव, कळंबआंबा, केवड या गावांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव पाणीदार करण्यासाठी नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण, बांधबंदिस्ती, वृक्षारोपणासाठी खड्डे, तलावातील गाळ काढणे, चर खोदणे व शोषखड्डे खोदणे यासारखी कामे सामुदायिक श्रमदानातून केली. या कामात अभिनेते जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी यांनी स्पर्धेतील गावांमध्ये श्रमदान करून पाणी संवर्धनाचे महत्व पटवून दिले. 

आमदार संगीता ठोंबरे, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, जिल्हा परिषद सदस्या डॉ. योगिनी थोरात, डॉ. अशोक थोरात यांनीही गावकऱ्यांसोबत श्रमदान करून हातभार लावल्याने लोकांमधला उत्साह वाढला. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, तहसीलदार अविनाश कांबळे, गटविकास अधिकारी उमेश नंदागौळ, तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनीही गावांमध्ये श्रमदान करून प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रदिनी राज्यातील शहरातील अनेक नागरिकांनी महाश्रमदान शिबिरात सहभागी होऊन श्रमदान केले. 

मराठवाडा

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

07.00 PM

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM