मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन बीड जिल्ह्यात अधिक तीव्र

maratha-kranti-morcha
maratha-kranti-morcha

बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर करुनच मेगा भरती करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाची तिव्रता जिल्ह्यात अधिकाधिक वाढत आहे. बुधवारी (ता. १८) परळीत सुरु केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारी (ता. २०) तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. 

दरम्यान, शुक्रवारी माजलगावमध्ये रास्ता रोको, केजमध्ये बंद आणि मोर्चा, कुंबेफळ (ता. केज) येथे रास्ता रोको तर परळी तालुक्यात तीन ठिकाणी व केज तालुक्यात एका ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या. माजलगाव येथे रास्ता रोको दरम्यान संतप्त युवकांनी खासगी वाहनाच्या काचा फोडून पोलिसांच्या दिशेने दगड मारले. निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर येथे ठिय्या आंदोलन सुरु झाले असून कार्यकर्ते मुंडनही करत आहेत. 

मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी बुधवारी परळी येथे पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. अगोदर आरक्षण निर्णय घ्या तरच आंदोलनातून माघार अशी भूमिका घेत आंदोलकांनी तेथील उपजिल्हाधिकारी/तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारीही आंदेालन सुरुच आहे. आंदोलनात दिवसेंदिवस गर्दी वाढत असून आता समाजातील महिलाही आंदोलन सहभागी होत आहेत. 

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी माजलगाव जवळील परभणी फाटा येथे रास्ता रोको करुन नंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा निघाला. निवेदन देण्यासाठी गेलेल्या मोर्चेकऱ्यांनी कार्यालय परिसरात ठिय्या धरला आहे. दरम्यान, रास्ता रोको दरम्यान संतप्त युवकांनी एका खासगी कारच्या काचा फोडल्या. तसेच पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली. केज शहरात व्यापारपेठ बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. याच तालुक्यातील कुंबेफळ येथेही रास्ता रोको करण्यात आला. 

पाच बस फोडल्या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार - शुक्रवार या दोन दिवसांत पाच ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी टालेवाडी (ता. माजलगाव) येथ बस फोडल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सकाळी परळी - धर्मापूरी या बसवर (क्रमांक एम. एच. २० डी. ९६९२) या बसवर अज्ञातांनी जोरदार दगडफेक करुन बसच्या सर्व काचा फोडल्या. तर गुरुवारी सायंकाळी परळी परिसरातच लातुर - परभणी या बसवर (क्रमांक एम. एच. - २० बी. ए. ३६११) दगडफेक केली. तर धर्मापूरी फाट्याजवळ पंढरपूर - गंगाखेड या बसवर (क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ००५९) दगडफेक करुन काचा फोडल्या. केजमध्ये माजलगाव - कळंब या बसवर (क्रमांक एम. एच. २० बी. एल. ०८२४) दगडफेक झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com