मराठा क्रांती ठोक मोर्चाची धग बीड जिल्ह्यात वाढली

Maratha Kranti Thok Morcha's in Beed district
Maratha Kranti Thok Morcha's in Beed district

बीड - मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शासनाने मेगाभरती करु नये या मागणीसाठी परळीत बुधवार (ता. 18) पासून सुरु झालेला मराठा क्रांती ठोक मोर्चाची धग आणि पाठींबा जिल्ह्यात वाढत आहे. मोर्चेकऱ्यांचा ठिय्या गुरुवारीही (ता. 19) सुरुच आहे. गुरुवारी बीडमध्ये ठिय्या आंदोलन, वडवणीत रास्ता रोको तर टालेवाडी (ता. माजलगाव) येथे बस फोडण्यात आली.

ठोस आश्वासना शिवाय परळीतून माघार नाही असा पवित्रा घेत आंदोलकांनी रात्रीचा मुक्कामही केला. गुरुवारी परळी परिसरातून युवकांची गर्दी वाढत आहेत. तर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर बीडमध्येही मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळ पासून ठिय्या आंदेालन सुरु केले आहे.

आंदोलनात समाजातील विविध घटकांसह पक्षीय मंडळींनीही सहभाग घेतला आहे. आंदोलकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर ठोस तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी सांगीतले. वडवणीही आंदोलनाला पाठींबा म्हणून बीड परळी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, तर, परळी-माजलगाव या बसवर टालेवाडी (ता. माजलगाव) येथे दगड मारुन काचा फोडल्याची घटना घडली. धारुरमध्ये समाज बांधवांनी तहसिलदारांना निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com