मराठा मोर्चाला कळंबमध्ये प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

कळंब (उस्मानाबाद) - कळंब तालुक्‍यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मूक मोर्चामध्ये गावागावांतील नागरिक सहभागी झाले होते.

कळंब (उस्मानाबाद) - कळंब तालुक्‍यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मूक मोर्चामध्ये गावागावांतील नागरिक सहभागी झाले होते.

मराठा मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुक्‍यातील बहुतांश गावांतील नागरिक पहाटेपासून शहरात दाखल झाले. आपापले व्यवसाय बंद ठेवून व्यापारी मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास विद्याभवन हास्कूलपासून मोर्चाला सुरवात झाली. विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक; तसेच डॉक्‍टर, वकील, शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी व शेवटी स्वयंसेवक, विद्यार्थी, तरुणवर्ग मोर्चामध्ये क्रमाने सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटरची रांग लागली होती. मोर्चात अचानक कोणी घुसू नये म्हणून स्वयंसेवकांनी साखळी पद्धत अवलंबिली होती. समारोपस्थळी विद्यार्थिनींची भाषणे झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

मोर्चेकऱ्यांसाठी सामाजिक संस्था, संघटना, मुस्लिम समाजातील नागरिकांकडून नाश्‍ता, पाण्याची सोय करण्यात आली होती.