मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आयोगाकडेच सोपवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

बीड - मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात ठोस भूमिका घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिल्यानंतर आरक्षणाचा विषय मागासवर्ग आयोगाकडे सोपवणेच उचित असून, सरकारनेही अशीच भूमिका घ्यावी, अशी मागणी मी शिवसंग्रामच्या वतीने मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याबाबत अनुकूल असल्याचे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बुधवारी सांगितले.

मेटे म्हणाले, ""मराठा आरक्षण शिवसंग्रामच्या अस्मितेचा प्रश्‍न असून सुरवातीपासून यासाठी संघर्ष केला आहे. आता हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे गेला, तर आयोगाला पूर्वीच्या पूर्वग्रह दूषितपणातून घेतलेल्या निर्णयाची समीक्षा करता येईल. आम्ही नव्याने दिलेल्या पुराव्यांचा विचार करता येईल. उच्च न्यायालयाकडे या बाबींसाठी तितकासा वेळ देता येणार नाही. म्हणून, मराठा आरक्षणाचा विषय मागासवर्ग आयोगाकडे सोपवावा, अशीच ठोस भूमिका सरकारने घ्यावी, ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकार या भूमिकेला अनुकूल असून, गुरुवारी (ता. 4) असे शपथपत्र न्यायालयात देणार आहे.''