मराठा बांधवानो, आरक्षणासाठी आता लढाईची तयारी ठेवा! 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद - "आपल्या हक्‍कासाठी होणारी आंदोलने हे सरकार दाबू पाहत आहे; मात्र लक्षात ठेवा, महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेला मराठा, गुजरातचा पाटीदार, राज्यस्थानातील गुर्जर आणि हरियानातील जाट समाज अशी आमची देशभरात 27 कोटी एवढी संख्या आहे. त्यामुळे आमच्या मतावर निवडून येणाऱ्यांनी आम्हाला गुलाम समजू नये, खरे तर त्यांनीच गुलामासारखे वागावे,'' असा सल्ला पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे सरकारला दिला; तसेच बांधवानो आता आरपारच्या लढाईसाठी खंबीरपणे सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. 

अखिल भारतीय छावा संघटनेचे अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन मंगळवारी (ता. 29) सिडकोतील राजीव गांधी मैदानावर पार पडले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. पटेल बोलत होते. ते म्हणाले, 'मराठा समाज शांततेत आंदोलने करतोय, याचा अर्थ तो शांत आहे, असे समजू नये. आम्ही शांततेतही क्रांती करू शकतो. मराठा एक तर मरतो अन्यथा मारतो, असा इतिहास आहे. मी पाटीदार नाही; तर मराठा हार्दिक पटेल आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे वंशज आहोत. आरक्षणाची भीक नाही, तर हक्क मागायला आलो आहोत,'' असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय ऍट्रॉसिटी कायद्यात जर सुप्रीम कोर्ट दुरुस्ती करू शकत असेल तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीही कायद्यात बदल करा, अशी मागणीही पटेल यांनी केली. 

या वेळी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या प्रसंगी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे यांची भाषणे दिली. मंचावर प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत आदी उपस्थित होते. 

आमच्यावर सत्ता गाजवू नका! 
महाराष्ट्रात मराठा समाज बहुसंख्य आहे, आतापर्यंत या राज्यात यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होऊन गेले. आता कोण बसलंय तर फडणवीस. त्यांना नागपूरवाल्यांनी बसवलं. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ते आमच्यावर सत्ता गाजवू शकत नाही, अशा शब्दांत श्री. पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Web Title: maratha society reservation