पाशा पटेल यांना अटक, सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

लातूर : येथील पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांच्या विरोधात येथील विवेकानंद पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी श्री. पटेल यांना अटक करून नंतर जामिनावर सुटका केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली. 

केंद्र शासनाने तूर, मूग व उडिदावरील निर्यातबंदी उठवली. याची माहिती देण्यासाठी शनिवारी दुपारी श्री. पटेल यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बसलेल्या ठिकाणी एका दूरचित्रवाणीचे पत्रकार विष्णू बुरगे बसले होते.

श्री. पटेल आतमध्ये येताच श्री. बुरगे यांनी श्री. पटेल यांना उद्देशून सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली, असे म्हटले. त्यानंतर श्री. पटेल यांनी या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली होती. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात होता. त्या नंतर पोलिसांनी श्री. पटेल यांना अटक करून नंतर जामिनावर सोडून दिले, अशी माहिती श्री. भातलवंडे यांनी दिली.