शाळकरी मुलीला स्पोर्टबाईकची धडक

accident
accident

औरंगाबाद : जालना रोडवर एस्. एफ्. एस्. शाळेजवळ शनिवारी (ता 25) दुपारी बारा वाजता स्पोर्ट् बाईकस्वार सेव्हनहील उड्डाणपूलाकडे जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या दोन शाळकरी मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात घडला. यात एक मुलगी व बाईकस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जालना रोडवर असलेल्या एस्. एफ्. एस्. शाळेच्या सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यावर एक विद्यार्थी व विद्यार्थिनी जालना रोड ओलांडून दुसऱ्या बाजूस येत असताना आकाशावणीकडून सेव्हनहीलकडे जाणाऱ्या स्पोर्टबाईकवर एक युवक भरधाव वेगाने येत होता. रस्ता ओलांडणारे र्विद्यार्थी गोंधल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व धडक बसली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला धडकून दुचाकी वर उधळली आणि समोर उभ्या असलेल्या चार दुचाकींवर पडली. 

दरम्यान नागरिकांनी धाव घेऊन जखमींना एमजीएम रूग्णालयात दाखल केले. अपघात पाहण्यासाठी गर्दी झाल्याने जालना रोडवर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी घट्नास्तळी धाव घेत दुचाकी हटवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. हा अपघात पाहणाऱ्यांनी सिनेस्टाईल हा अपघात घडल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com